नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे उद्या आयोजन…

शिल्पा खोत आणि माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळ यांच्याकडून करण्यात आले आयोजन…

मालवण, दि प्रतिनिधी:
नवरात्रौत्सवा निमित्ताने धुरीवाडा येथे सौ. शिल्पा खोत आणि माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी गरबा आयोजित करण्यात आला आहे. याचेच औचित्य साधून उद्या सोमवारी महिलांसाठी “खेळ पैठणीचा” कार्यक्रम मुलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. याठिकाणी विजेत्यांवर आकर्षक बक्षीसांची उधळण करण्यात येणार आहे.

महिलांसाठी उद्या सोमवारी खेळ पैठणीचा आणि लहान मुलांसाठी फनीगेम होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी नावनोंदणीसाठी सौ. शिल्पा खोत ९३२६४७७७०६ किंवा सौ. सायली कांबळी ९७६४३९७१३९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page