⚡बांदा ता.०२-: कास येथील श्री माऊली मंदिरात सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता उद्योजक आबा राणे पुरस्कृत गोव्यातील कलाकारांची संगीत मैफील आयोजित केली आहे. यात प्रसिद्ध गायक सुरज शेटगांवकर व गायिका अर्चना कामुलकर यांचा सहभाग अाहे. त्यांना सुरज मोरजकर (तबला), सुजन सावंत (हार्मोनियम), संकेत भगत (पखवाज) साथसंगत करणार आहेत. प्रदीप पंडीत हे कार्यक्रमाचे निवेदन करतील. भाविकांनी व संगीत प्रेमी रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कास ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले आहे.
कास गावात उद्या सुगम संगीत मैफील
