⚡मालवण ता.०२-: कुमारी मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा अर्चा करीत आणि श्री देवी भद्रकाली देवीचा जागर करीत आज मालवण तालुक्यातील रेवंडी गावची ग्रामदेवता श्री देवी भद्रकाली मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त कुमारी पूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. यात १०८ कुमारींचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रेवंडी येथील भद्रकाली मंदिरात सकाळी साडे नऊ वाजल्यापासून या कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात मालवणसह जिल्ह्यातून भाविक जोडपी व त्यांच्या ४ ते १० वर्षे वयोगटातील कुमारी सहभागी झाल्या होती. या कार्यक्रमासाठी भद्रकाली देवस्थान कमिटीने व्यवस्था व नियोजन केले होते. यावेळी अरविंद नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित १०८ जोडप्यांनी कुमारींचे पूजन केले. कुमारींचे पाद्य पूजन करतानाच त्यांना सौंदर्य प्रसाधनांनी साज शृंगारही करण्यात आला. यावेळी कुमारींना विविध भेटवस्तूही देण्यात आल्या. तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी श्री भद्रकाली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष युवराज कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. यावेळी अध्यक्ष युवराज कांबळी, सचिव विजय कांबळी, खजिनदार जयराम कांबळी, विश्वस्त प्रसाद कांबळी, शामसुंदर तळाशीलकर, रामकृष्ण जोशी, गणेश कांबळी, लक्ष्मण रेवंडकर, वर्सलदार १ रवींद्र कांबळी, वर्सलदार २ नितीन कांबळी, वर्सलदार ३ सुनील कांबळी, पुजारी विलास कांबळी, सल्लागार अशोक कांबळी, निमंत्रित अरविंद कांबळी, समितीचे अजित कांबळी, उदय कांबळी, नरेश करलकर, दिलीप मोर्वेकर, प्रकाश कांबळी, लक्ष्मण कांबळी, लिपिक श्रद्धानंद कांबळी, लकी कांबळी सरपंच प्रिया कांबळी, तारक कांबळी,सोनाली कोदे, आदी व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लकी कांबळी यांनी केले.
