⚡कणकवली ता.०२-:
कणकवली शहरात प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वारावर जानवली नदीवरील पुलावर मधील दुभाजकावर कणकवली रोटरी क्लबच्यावतीने बसविलेल्या रोटरी व्हीलचे अनावरण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले
रोटरी क्लब च्या माध्यमातून कणकवली शहरात विविध उपक्रम राबविले जात असताना सामाजिक ऐक्य व संघटन चा संदेश देणाऱ्या रोटरी क्लबच्या माध्यमातून या रोटरी व्हील च्या अनावरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने “स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली” चा संदेश देखील देण्यात आला. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब, डॉ. विद्याधर तायशेटे, मेघा गांगण, गुरु पावसकर, रवी परब, बंडू गांगण, नितीन बांदेकर, माधवी मुरकर, महेंद्र मुरकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी कणकवली रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले.
