मळगाव इंग्लिश स्कूल मळगावला शासकीय रेखा कला परीक्षा केंद्रासाठी मान्यता

⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेच्या इतिहासात आणखी एक नोंद झाली. या प्रशालेला शासकीय रेखा कला परीक्षा केंद्रासाठी नव्याने मान्यता मिळाली आहे. यामुळे पंचक्रोशीतील शाळांची सुविधा झाली आहे.
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षासाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावमध्ये या शासकीय रेखा कला परीक्षा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रावर मळगाव हायस्कूल, सोनुर्ली हायस्कूल, तळवडे हायस्कूल, साई होली इंग्लिश स्कूल निरवडे या प्रशाळे मधून १५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले. मळगाव केंद्र झाल्यामुळे जवळपासच्या सर्व शाळांची सुविधा झाली. यावेळी शाळेचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी सर साई होली फेथ इंग्लिश स्कूल व मळगाव शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश तिवरेकर कर सर यांनी तर आभार प्रदर्शन फाले सर यांनी मानले.

You cannot copy content of this page