जेष्ठ नागरिक दिन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत साजरा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सावंतवाडीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या दिनाच औचित्य साधून सावंतवाडी रवींद्र मंगल कार्यालय इथं ज्येष्ठ नागरिक मेळावा पार पडला.

याप्रसंगी सामाजिक कार्यान ज्येष्ठ व गरजूंसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ‘श्रावणबाळ’ पुरस्कारान गौरविण्यात आले. तर शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंत्री दीपक केसरकर म्हणाले, तुमचं प्रेम जास्त महत्त्वाच आहे. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधार असतात‌. या वटवृक्षाच्या छायेत समाज बहरत असतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी- आजोबांच प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे शाळांमध्ये आजी- आजोबा दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली असून महाराष्ट्र आजी-आजोबा दिन साजरा केला जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी एका चिमुकल्यांंन मंत्री दीपक केसरकर यांना ग्रिटींग कार्ड भेट दिल.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक अण्णा देसाई, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बळवंत मसुरकर, सचिव प्रकाश राऊळ, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बी.एन. तेली यांसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page