बापार्डे गावाला आ नितेश राणे यांची भेट

स्वच्छतेत कोकण विभागात मिळविला आहे प्रथम क्रमांक बापार्डे गावाने


देवगड-प्रतिनिधी
देवगढ़ कणकवली मतदार संघाचे आमदार नितेशजी राणे यानी संत गाडगेबाबा स्वछता अभियान मधे कोकण विभागातुन प्रथम आलेल्या बापर्डे गावाला नुकतीच भेट देवून बापर्डे गावाने स्वछतेच्या बाबतीत गावात केलेल्या विशेष कामाची पाहणी करण्यात आली.
यावेळी गावात गांडूळखत प्रकल्प,बॉयोगॅस, शोषखड्ढे,गावातील रंगरंगोटी, गावातील सोलर सिस्टीम द्वारे सुरु असलेले स्ट्रीट लाइट व सर्वे सरकारी इमारती,,गावातील सर्व अंगणवाडी याचे रंगरंगोटी, पाऊस पाणी संकलन आणि इतर बऱ्याच कामाची प्रशंसा केली,व भविष्यात बापर्डे ग्रामपंचायत ला विकासात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली,यावेळी आमदार मा, नितेशजी राणे यांनी गावचे सरपंच,ग्रामसेवक,सर्व सद्यस्य तसेच गावातील सर्व शासकीय कर्मचारी याचे सत्कार केले.
बापर्डे गावात गेल्या दोन वर्षात जिल्हा नियोजन व 2515 व इतर निधीतून जवळपास 1 कोटी 30 लाख ची कामे आमदार याच्या प्रयत्नातून काही झालीत व काही मंजूर झाली याबद्दल गावाच्या वतीने सरपंच संजय लाड यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.यावेळी व्यासपीठावर मंडळ अध्यक्ष अमोल तेली व संतोष किंजवडिकेर ,संदीप साटम,उत्तम बिर्जे,बड्या नारकर,सरपंच राजू जठार, अनघा राणे,अजित राणे,संदीप नाईकधुरे, संतोष नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, बापूजी नाईकधुरे, तलाठी,मंडळ अधिकारी , ग्रामसेवक शिवराज राठोड व तेरसे ,ग्रामपंचायत सदस्य व गावातील इतर मान्यवर उपस्तीत होते.
फोटो- आमदार नितेशजी राणे यानी संत गाडगेबाबा स्वछता अभियान मधे कोकण विभागातुन प्रथम आलेल्या बापर्डे गावाला भेट दिली.

You cannot copy content of this page