नाम. नारायण राणे यांचे गौरवोद्गार;
प्रदर्शनातील फोटोंचे एक पुस्तक बनवून जनतेपर्यंत पोहोचवा
⚡कणकवली ता.३०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले चित्र प्रदर्शन हा उपक्रम स्तुत्य आहे. परंतु या प्रदर्शनातील फोटो पेक्षा कित्येक पटीने नरेंद्र मोदी यांचे कार्य मोठे असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले. तसेच या प्रदर्शनातील सर्व फोटोंचे एक पुस्तक बनवून ते जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरावडा आयोजित करण्यात आला असताना या सेवा पंधरावडयाच्या निमित्ताने कणकवलीत भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली पेट्रोल पंप समोर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी , सौ. नीलमताई राणे,आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा, गांगण, अण्णा कोदे, विराज भोसले, शिशिर परुळेकर, सरपंच संतोष राणे, बबलू सावंत, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, ,डॉ.मिलिंद कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, संदीप मेस्त्री, महेश सावंत, पंढरी वायगणकर,संतोष परब,बाबू गायकवाड,महेश सावंत,मेघा सावंत,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, प्रकाश सावंत,प्राची कर्पे,लक्ष्मण घाडीगावकर,राजन चिके,महेश शिरवलकर,संतोष राणे,नितीन पाडावे, इब्राहिम शेख,आनंद घाडीगावकर,दिगंबर सावंत,समर्थ राणे,सचिन पारधिये,संदीप रमाकांत सावंत,संदीप सावंत जानवली आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना.राणे म्हणाले,चित्र प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील वाटचालीत घेतलेले यशस्वी निर्णय दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री,पदाधिकारी व कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा साजरा करत आहेत.जनतेच्या हिताचे निर्णय लोकांपर्यत पोहचवले जात आहेत.हे प्रदर्शन आयोजित करून एक चांगला उपक्रम राबविला असल्याचे कौतुक ना.राणेंनी यावेळी केले.
