विक्रेत्यांना पालिकेने त्रास देण्याचे बंद करावे

अन्यथा शिवसेना स्टाईल ने उत्तर देवू;शब्बीर मणियार यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील बाजारपाठेत तालुक्यातील विक्रेत्यांना पालिका प्रशासनाकडून देण्यात येणारा त्रास थांबविण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर देऊ अशा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी दिला आहे.तर तालुक्यातील विक्रेत्यांना नगरपालिका प्रशासन बाजारपेठेत बसण्यास आडकाठी आणत असतांना दुसरीकडे मात्र परप्रांतीयांना धारा देत आहे यामागचे गौडबंगाल काय असा सवालही श्री मणीयार यांनी उपस्थित केला आहे.

श्री मणीयार यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, सावंतवाडी शहरांमध्ये तालुक्यातील महिला विक्रेत्या रोजी रोटीसाठी दररोज सकाळी व्यवसाय करण्यासाठी येतात ग्रामीण भागातून आणलेला भाजीपाला दुपारी बारा वाजेपर्यंत विकून त्या परंतु गेले काही दिवस नगरपालिका प्रशासनाकडून अशा महिला विक्रेत्यांवर अन्याय केला जात आहे त्यांना रस्त्यावर विक्रीस बसण्यास अटकाव केला जात आहे त्या ठिकाणी बसू नका त्या ठिकाणी बसू नका असा तगादा संबंधित कर्मचाऱ्यांकडून केला जातो त्यामुळे बऱ्याचदा या महिलांचा आणलेला वस्तू ही विक्रीस जात नाही परिणामी त्यांना नुकसान सहन करायला लागते सद्यस्थितीत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय फळविक्रेते किंवा हात गाडी व्यवसाय करत आहेत परंतु अशा व्यावसायिकांना नगरपालिकेकडून एक प्रकारे अभय दिला जातो मात्र आपल्या तालुक्यातील महिला विक्रेत्यांना नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा हा शिवसेनेच्या माध्यमातून या विक्रेत्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहो.

श्री मणियार यांनी पत्रकात पुढे म्हटले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावठी आठवडा बाजार बसवण्यात आला होता परंतु हे बाजार बंद पडले आहेत पुन्हा एकदा पसरण्याने यामध्ये पुढाकार घेऊन असे बाजार पुन्हा भरवल्यास अशा महिला विक्रेत्यांवर अन्याय होणार नाही पालिका प्रशासनाने परप्रांतीयांना अभय दिल्यास आणि स्थानिकांवर अन्याय केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.

You cannot copy content of this page