प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने जीवितहानी टाळली
⚡कणकवली ता.२९-: संपलेल्या सिलिंडरच्या जागी भरलेला सिलिंडर लावत असतानाच सिलेंडरचा नॉब उघडत असताना सिलेंडरने तेथील आगीच्या संपर्कात आल्याने अचानक पेट घेतला.प्रसंगावधान राखत बबन चव्हाण यांचा मुलगा राजू चव्हाण यांनी पेटता सिलेंडर घराबाहेर ढकलला. यात येथील घराच्या वाशांना आग लागली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.ही घटना कणकवली शहरातील जळकेवाडी येथे घडली.
कणकवली शहरातील जळकेवाडी येथील घरगुती सिलेंडरचा नॉब उघडत असताना सिलेंडरने तेथील आगीच्या संपर्कात आल्याने अचानक पेट घेतला. कणकवली जळकेवाडी येथील बबन चव्हाण यांच्या घरात गुरुवारी सकाळी 9 वा. सुमारास ही घटना घडली. प्रसंगावधान राखत बबन चव्हाण यांचा मुलगा राजू चव्हाण यांनी पेटता सिलेंडर घराबाहेर ढकलला.
पेटलेला सिलिंडर किचनरूमच्या बाहेरील पडवीत ढकलला. तेथे सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांनी पडवीतील कौलेही उडाली आणि वाशांनीही पेट घेतला. तेथील वॉशिंग मशिन, पाण्याची टाकी जळून नुकसान झाले. अगदी नजीकच्या झाडांच्या पानांनाही आगीची झळ बसली होती.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह स्थानिकांनी पl सिलेंडरची आग विझवली. यात घराबाहेर सिलेंडर ढकलल्याने पेटत्या सिलेंडरमुळे तीन वाशांनी पेट घेतला.
या घरापर्यंत जाण्यासाठी अरूंद रस्ता असल्यामुळे घटनास्थळापर्यंत अग्निशमन बंब पोहोचू शकला नाही. परंतु नंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह सर्वांनी सतर्कता बाळगून छोट्या बंबाला पाचरण करण्यात आले. तत्पूर्वीच नागरिकांनी आग आटोक्यात आणली.सदर घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक बंडू गांगण, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत कर्मचारी रोहन डीचोलकर, विनोद जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आहेत.
