मळगाव येथे उद्या शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

सखी भिशी ग्रुप व इनरव्हील क्लब सावंतवाडीच्यावतीने आयोजन

⚡सावंतवाडी ता.२८ सहदेव राऊळ -: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयामध्ये येथील ‘सखी भिशी ग्रुप व इनरव्हील क्लब सावंतवाडी’ यांच्यावतीने गावातील महिलांसाठी उद्या ३० सप्टेंबर रोजी शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चालणार आहे. ही तपासणी सर्व महिलांसाठी मोफत असून मळगाव गावातील महिला व युवतीने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सखी भिशी ग्रुप व इनरव्हील सावंतवाडी’तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page