विजयराव नाईक बी. फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल

⚡कणकवली ता.२८-: युवक कल्याण संघ संचलित, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२१ २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेचा प्रथम वर्ष सत्र -१ आणि द्वितीय वर्ष सत्र – ३ बी. फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

प्रथम वर्ष सत्र १ या परीक्षेमध्ये रिया नार्वेकर (९.७२ SGPA) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तसेच प्रीती चव्हाण (९.७० SGPA) व निधी वाघट (९.६२ SGPA) गुण मिळवून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तसेच, द्वितीय वर्ष सत्र-३ या परीक्षेमध्ये भक्ति वायंगणकर ( ९.७५ SGPA) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तसेच सुकन्या रसाळ (९.७१ SGPA) व दिशा मयेकर (९.67 SGPA) गुण मिळवून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आम. वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य पुजा पटेल, बी. फार्मसी परिक्षा विभाग प्रमुख प्रा. निशा करंदीकर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

You cannot copy content of this page