Live in महाराष्ट्र न्यूज चॅनल ठरला 2022 च्या कोकण कलारत्न पुरस्काराचा मानकरी…

चिपळूण एमआयडीसी सांस्कृतिक केंद्र येथे भव्य पुरस्कार सोहळा संपन्न

⚡चिपळूण दि.२८-: निलेश आखाडे स्वामी विवेकानंद रिसर्च अँन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक्सल इंडस्ट्रीज लोटे आणि शाहीर रत्नाकर महाकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण कलारत्न पुरस्कार सोहळा 2022 च भव्य आयोजन चिपळूण एम आय डी सी उद्योग भुवन परीसरात संपन्न live in महाराष्ट्र न्यूज चॅनल ठरला पुरस्काराचा मानकरी .कोरोना सारख्या महामारी च्या काळात चॅनल मार्फत अनेक लोककला live महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आपल्या जिल्ह्यातील ,कोकणामधील संस्कृतिक उपक्रम,लोककलेच थेट प्रक्षेपण live in महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचली.

कोकण कलेचा वारसा आणि सह्याद्रीच्या कुशीत परशुरामाच्या भूमीत वसलेल्या पवित्र कोकणात अनेक कलाकार जन्माला आले कलाकारांना विशिष्ट न्याय सन्मान मिळन गरजेच आहे. कोकणातील अनेक कलाकार हिऱ्याच्या रूपाने जन्माला आले.त्यांच्या या केलेला न्याय मिळावा त्यासाठी कोकण कला रत्न पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करणयात आल. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण एम आय डी सी उद्योग भुवन येथे भव्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणयात आलं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन प्रशांतजी पटवर्धन लोटे पर्शुराम इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष मा. श्री. ह.भ.प. रुपेश महाराज राजेशिर्के कोकण दिंडी फड मालक मा. श्री. विवेक शेंडे व्ही. आर. टी. आय. प्रकल्प समन्वयक

मा. श्री. राजजी आंब्रे लोटे पर्शुराम इंडस्ट्रीज असोसिएशन जनरल सेक्रेटरी मुख्य प्रवर्तक व्ही. आर. टी. आय. माझे कोकण

मा. श्री. सुरेश पाटणकर

मा. श्री. दिलीप जाधव

मा. श्री. महादेव बाळू नाचरे (गुरुजी) अध्यक्ष पुरोगामी कलगी तुरा उन्नती मंडळ

स्वामी विवेकानंद रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इंन्स्टीट्यूट एक्सल इंडस्ट्रीज लोटे आणि शाहिर रत्नाकर महाकाळ फाऊंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते.

सदरहू पुरस्कारानिमित्ताने ठाणे , रायगड, रत्नागिरी, मुंबई,सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील मान्यवर व पुरस्कार विजेते हे उपस्थिती होते

You cannot copy content of this page