⚡कणकवली ता.२८-: येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली काँलेज, कणकवली येथील इतिहास विभागात कार्यरत असलेले प्रा.डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवीचे मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.
अलीकडील काळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात इतिहास विषयात पीएच.डी. मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते त्यामुळे आता इतिहास विषयांत नव्याने संशोधन करणाऱ्या तळकोकणातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांना पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, इतिहास विषयाचे विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
