देवगड –
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विभाग जिल्हा परीषद सिंधुदूर्ग आयोजित ‘ आमचा गाव आमचा विकास “ उपक्रमांअतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबतचे प्रशिक्षणाचे उदघाटन कुणकेश्वर येथे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग .राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते झाले .
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विशाल तनपुरे , गटविकास अधिकारी . अरूण चव्हाण , कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता विभाग ) . विनायक ठाकुर , विस्तार अधिकारी .पंढरीनाथ फाले , विस्तार अधिकारी .महादेव शिंगाडे , विस्तार अधिकारी निलेश जगताप , विस्तार अधिकारी अंकुश जंगले, ग्रामविकास अधिकारी . नारायण सिताराम माणगांवकर , ग्रामपंचायत विभाग लेखापाल श्रीम .सरोजीनी गुराम, लिपिक सारीका पावसकर , ग्रामविकास अधिकारी रामदास हडपिडकर , कुणकेश्वर ग्रामसेवक . मनिष टकले , प्रविण प्रशिक्षक तुकाराम रामचंद्र साईल , पंढरीनाथ सिताराम माणगांवकर , हर्षदा हनुमंत वाळके , संतोष घनश्याम पाटील , सचिन कदम आदी मान्यवर उपस्थित होते .
आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करताना उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग .राजेंद्र पराडकर म्हणाले कि ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर ग्रामपंचायती अधिक सक्षम बनविणारी ‘आमचा गाव आमचा विकास’ हा उपक्रम सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून निश्चित यशस्वी होईल. ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे असुन आपल सर्वाचे भाग्य म्हणूनच आपल्याला या माध्यमातुन गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली या संधीच सोन करण्यासाठी हे महत्वाच प्रशिक्षण गावाचा सर्वांगिन विकास करण्यासाठी करावा असे ते म्हणाले . तसेच कुणकेश्वरमध्ये या निसर्गरम्य व प्रसन्न वातावरणात हे प्रशिक्षण होत असल्याने त्याचा फायदा ही तुम्हाला होईल असेही ते म्हणाले .
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग .विशाल तनपुरे म्हणाले की गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी आमच गाव आमचा विकास या प्रशिक्षणातील बारकावे निट जाणुन त्याप्रमाणे ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावा असे ते म्हणाले .
यावेळी गटविकास अधिकारी देवगड श्री अरूण चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाले कि ग्रामस्तरावर लोकसहभागातून गावांच्या गरजा, उपलब्ध साधनसामग्री निकड व प्राधान्यक्रम ठरवून हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करुन परिपूर्ण आराखडे तयार होणेसाठी हे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे ते म्हणाले .
या प्रशिक्षणामध्ये सिंधुदूर्गातील प्रभारी अधिकारी उपस्थित होते . या प्रशिक्षणामध्ये प्रभारी अधिकारी व पर्यवेक्षक यांच चार दिवसाच प्रशिक्षण होणार आहे .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक .पांडुरंग शेडगे यांनी केल .तर प्रस्तावना विस्तार अधिकारी . अंकुश जंगले यांनी केली .
आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत ग्रा.पं विकास आराखडा तयार करणे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन…
