शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामास सुरुवात…

माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत केली पाहणी…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील शासकीय विश्रामगृह नूतनीकरण कामाला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या कामाला भेट देत पहाणी केली. यावेळी राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे लवकरच मालवण दौऱ्यावर येणार असून यावेळी ते या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करतील अशी माहिती दिली.

मालवण येथील शासकीय रेस्ट हाऊसच्या नूतनीकरणासाठी सुमारे ३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या रेस्ट हाऊसचे नूतनीकरण करताना सहा खोल्या बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी परिसर सपाटीकरण काम सुरू आहे. माजी खासदार राणे यांनी सोमवारी त्याची पाहणी करून बांधकाम अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाबा परब, दिपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, पूजा करलकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, आनंद शिरवलकर, प्रमोद करलकर, आबा हडकर, मोहन वराडकर, विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, योगेश घाडी आदी उपस्थित होते.

राणे म्हणाले, आरसे महाल नूतनीकरण अंदाजपत्रक तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात झाले. मात्र, मागील सरकारच्या काळात हे काम रखडले. आता विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या कार्यकाळात या कामाला गती मिळाली आहे. स्थानिक आमदार वैभव नाईक यांचा या नूतनीकरण कामाशी काहीही संबंध नाही असे राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page