⚡मालवण ता.२७-:
जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असून सोमवारी रात्री अज्ञाताने चिंदर बाजारपेठ येथील भर वस्तीतल्या साईमंदिराचा दरवाजा तोडत दान पेटीतील रक्कम लंपास करण्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आचरा पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली आहे.
चिंदर बाजारपेठ येथे आचरा कणकवली रस्त्यावर भर वस्तीत असलेल्या साई मंदिराच्या दरवाजाचे ग्रील तोडल्याचेहग्रामस्थांच्या नजरेस पडताच मंडळाच्या पदाधिकारयांना याची खबर देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष नितीन पावस्कर यांनी याबाबत आचरा पोलीसांना खबर देताच आचरपोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील आणि त्यांच्या सहकारयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला तसेच ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.घटनास्थळी डाग स्कॉड मार्फत चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला गेला .सदर दान पेटीत अंदाजे दोन हजाराची रक्कम लंपास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीडी पाटील करत आहेत.
