सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक अॅडव्होकेट प्रमोद प्रभू आजगावकर यांचे दि
२५ रोजी मुंबई येथे दु:खद निधन झाले..अॅडव्होकेट प्रभू आजगावकर हे मनमिळावू सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी संस्थेला वेळोवेळी कायदेशीर सल्ला दिला.
महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमामध्ये ते नेहमी हजर असत. विद्यार्थ्यांना , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना ते सतत मार्गदर्शन करीत असत. राजघराण्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांच्या जाण्याने एक कायदेशीर मार्गदर्शक हरपला असे वक्तव्य, आपल्या श्रद्धांजली पर मनोगता मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले .
यावेळी संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत , प्रा. डी डी गोडकर, डॉ एस ए. ठाकूर ,डॉ बी एन हिरामणी, डॉ यु एल देठे, प्रा. डी एन पाटील तसेच कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.
