सावंतवाडी: स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याकडे सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेले २१ वर्षे ते सावंतवाडीत कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून त्यांची भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी,डाॅ मुरली चव्हाण,अनिकेत पाटणकर,राघवेंद्र चितारी,संदिप निवळे,प्रथमेश प्रभू,शुभम बिद्रे,सूरज मठकर,वैभव दळवी आदी उपस्थित होते.
