प्रथम राष्ट्रसेवा या भावनेतून कार्यरत व्हा

उत्तर भारत भाजपा मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते अमित त्रिपाठी यांचे आवाहन

⚡कणकवली ता.२६-: पूर्वाचल, उत्तरांचल मध्ये ज्या पद्धतीने योगी सरकार आल्यानंतर गुंडशाही संपून शांतता प्रस्थापित झाली आहे त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा येत्या काळात सुख आणि शांतता निर्माण होईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशात समृद्धी आणि शांती प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. या कामात आपण ज्या ज्या प्रांतात असाल आणि देशात जेथे काम करत असता तेथे प्रथम राष्ट्रसेवा या भावनेतून कार्यरत व्हा..! असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारत भाजपा मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते अमित त्रिपाठी यांनी केले.

कणकवली येथे एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात अन्य राज्यातील,व्यापारी,दुकानदार,कारागीर,कामगार कुटुंबियांच्या प्रतिनिधीच्या कणकवली प्रहार भवन येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक भाजपा आमदार नितेश राणे, भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी सभापती मनोज रावराणे व अन्य उपस्थित होते.
कणकवली गावचे सुपुत्र असलेले केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यासोबत देशात काम करत असताना आपण कणकवलीतले म्हणून अभिमान बाळगला पाहिजे.तर कणकवलीत आमदार नितेश राणे अन्य राज्यातून आलेल्या कुटुंबीयांना सातत्याने मदत करतात त्यांच्यासोबत वावरतात त्यांच्या अडचणी सोडवतात अशा नेतृत्वावर विश्वास ठेवून कायम राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले,पूर्वाचल, उत्तरांचल मध्ये खूप गुंडगिरी सुरू होती. आता योगी सरकारच्या काळात शांतता आली आहे. ही परिस्थिती बिहार मध्ये आणायची आहे.. देशाने मोदी ना स्वीकारले आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page