असलदे येथे महीलांची आरोग्य तपासणी

⚡कणकवली ता.२६-: शासनाच्या माध्यमातून आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत नवरात्र उत्सव निमित्ताने कणकवली तालुक्यातील असलदे येथे मोफत 18 वर्षे पुढील सर्व महीलांची आरोग्य तपासणी व औषधे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, दिविजा वृध्दाश्रम अध्यक्ष संदेश शेटये, ग्रामसेवक आर.डी.सावंत, सदस्य दिनेश तावडे,संचिता नरे,प्रतिभा खरात, वंदना हडकर,सपुदाय आरोग्य अधिकारी प्रणाली कदम, आरोग्य सेविका वंदना मराठे, एस.एस.खानोलकर, नम्रता मुसळे,पर्नवी तांबे,सलिका साटविलकर,आशा सेविका भाग्यश्री नरे, श्रुतिका तांबे आदी उपस्थित होते.
या तपासणी शिबिरात एकूण 120 महीलां ची मोफत तपासणी करण्यात आली आहे.
असलदे ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून औषधे,मेडिक्लोर व शौचालय पाईप जाळी वाटप करण्यात आली तसेच दिविजा वृध्दाश्रम तर्फे बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page