घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा दणका
⚡कणकवली ता.२६-: सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगाने सुरू असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर कणकवली व मालवण तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आग्रे, माजी सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, बबन शिंदे, विलास साळसकर, शेखर राणे, सुनील पारकर आदी उपस्थित होते. मालवण तालुक्यातील किर्लोस, शिरवंडे, अजगणी तसेच कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील 100 हुन अधिक कार्यकर्त्यांनी शिंदेगटात प्रवेश केला. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. माजी सरपंच, ग्रा पं सदस्य, शेतकरी, युवक युवतींचा यामध्ये समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लागतील याची खात्री आहे. केवळ भौतिक सुविधा म्हणजे विकास नव्हे तर शेतकऱ्यांचा विकास आणि युवक युवतींच्या हाताला रोजगार म्हणजे खरा विकास होय. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी झटत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज शिंदे गटात सामील होत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
