अखिल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्गनागरी ता २६
“आम्हाला शिकवू द्या”या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उपोषण, मोर्चे , धरणेआंदोलन तसेच निवेदन आदिच्या माध्यमातून शासनांचे लक्ष वेधण्यात येत आहेत. तरीही
शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शिक्षकांना शिकविण्याच्या कामांसाठी वेळ कमी मिळत असून शाळाबाह्य कामात शिक्षकांना अधिक वेळ जात आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.”आम्हाला शिकवू द्या ” या प्रमुख मागणीसह शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याप्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक स़ंघ सिंधुदुर्गच्या वतीने निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहेत.

  • निवेदनातील प्रमुख मागण्या
  • जुनी पेन्शन योजना लागू करा
  • शिक्षणसेवक योजना रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा
  • नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .
  • सातव्या वेतन आयोगाचा खंड -२ प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
  • शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे कमी करावी
  • शिक्षकांची जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
  • ९ सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी
  • शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
  • शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
  • MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे तात्काळ भरून आंतरजिल्हा बदली होऊनही कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त होण्यासाठी सोय उपलब्ध करून दयावी * शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी ‘ गटशिक्षणाधिकारी (प्रशासकीय पदे ) तात्काळ भरण्यात यावी
  • शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी.
    *सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
  • शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
  • अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
  • शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे.
    तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे
जिल्हाध्यक्ष राजा कविटकर सरचिटणीस बाबाजी झेंडे .यांच्यासह पदाधिकारी पूनम पालव,श्रावणी सावंत,महादेव देसाई,प्रशांत पारकर,आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page