बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
चित्रकला पहिली ते चौथी गट – (प्रथम तीन क्रमांकानुसार) इयत्ता पहिली- भार्गव सावंत, स्वरा माजगावकर, तेजस कदम. इयत्ता दुसरी- तेजस्विनी कदम, शरण्या वायंगणकर, श्रेयस पाटील. इयत्ता तिसरी- काव्या चव्हाण, दुर्वा नाटेकर, तनिष्का देसाई.
इयत्ता चौथी- नील बांदेकर, गायत्री गवस, सर्वेक्षा ढेकळे.
पाचवी ते सातवी गट निबंध स्पर्धा. इयत्ता पाचवी- पूर्वा मोर्ये, नैतिक मोरजकर, अनुष्का झोरे. इयत्ता सहावी- शमिका केसरकर, मानसी सावंत, ऋतुजा बांदेकर. इयत्ता सातवी- ईश्वरी वावळीये, उर्वी बांदेकर, आर्या ठाकूर.
विजेत्या स्पर्धेकांना सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश पाणदरे, वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, महाबळेश्वर सामंत, अंकुश माजगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, जे डी पाटील, सौ अर्चना सावंत यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब यांच्यासह शिक्षक, पालक, वाचक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जे डी पाटील यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
फोटो :-
बांदा येथे विजेत्या स्पर्धेकांसोबत उपस्थित मान्यवर.
नट वाचनालयाच्या निबंध, चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
