⚡वेंगुर्ला ता.२५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षाच्या आपल्या कार्यकालात सर्व सामान्य जनतेला घर, शौचालय, मोफत गॅस कनेक्शन, मोफत विज कनेक्शन, आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत मदत, शेतकरी सन्मान योजनेतून तीन महिन्यांनी खात्यात पेसे, गरीब कुटुंबांना मोफत धान्य आदी आवश्यक असलेले लाभ मिळवून दिले आहेत. अशा लाभार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानणारी पत्रे भाजपा कार्यालयात आणून दिली. लाभार्थ्यांनी दिलेली पत्रे पंतप्रधांनापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यर्त्यांनी पोस्टातील पत्रपेटीत सुपूर्द केली आहेत.
यावेळी विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थ्यांसह भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, श्रेया मयेकर, हसिनाबेन मकानदार, रसिका मठकर, दुर्वा माडकर, दादा केळुसकर, मनवेल फर्नांडीस, शशिकांत करंगुटकर, रुपेश माडकर, शालिनी चिपकर, जितेंद्र जाधव, नेहा पालयेकर, तृप्ती आरोलकर, समुद्धी बांदेकर, उद्योजक अंबरीश मांजरेकर आदी उपस्थित होते.
