‘स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र‘ यावर व्याख्यान संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२५-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र‘ यावर डॉ.प्रमिला बत्तासे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यात ऑनलाईन १०० तर ऑफलाईन ४५ जण सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात जलदिनाचे औचित्य साधून जलसंवर्धनाचा संकल्प वाचून केली. तन्वी तुळसकर या विद्यार्थीनीने उपस्थितांना जलसंवर्धाची शपथ दिली.

  आरोग्य मंत्रालयाकडून सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून घोषित केला आहे. आरोग्याच्यादृष्टीने सर्वांनाच योग्य पोषण हे महत्त्वाचे आहे. आहार, आहारातील पोषक घटक, अन्नाचे कार्य, अन्न पदार्थावर केल्या जाणा-या प्रक्रिया, खाद्यतेल आणि आपला पारंपरिक आहार, फ्री रॅडिकलस् व रोग या विषयी डॉ.प्रमिला बत्तासे यांनी विस्तृत माहिती दिली.

  या कार्यक्रमाला रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजिव चमणकर, प्रा.बी.एम.भैरट, प्रा.ए.बी.नरगच्चे, संजय परब, पी.ए.बोवलेकर व विद्यार्थी उपस्थित होते. महिला विकास कक्षाच्या अध्यक्ष डॉ.धनश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा.राजाराम चौगले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
You cannot copy content of this page