पर्यावरण आयाम, सागरी सीमा मंचचे आयोजन
देवगड-प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने रा स्व संघाचा पर्यावरण आयाम ,सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून सागर किनारा स्वच्छता अभियांन देवगड तालुक्यामध्ये संपन्न झाले .
देवगड मधील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ व देवगड जामसंडे नगरपंचायत तसेच मिठमुंबरी, कुणकेश्वर,मिठबाव व विजयदुर्ग येथील ग्रामपंचायती व हायस्कूल तसेच स ह केळकर महाविद्यालय देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने सागर किनारा स्वच्छता अभियान संपन्न झाले , यामध्ये देवगड येथील तारामुम्बरी व देवगड बीच तसेच मिठबाव , मिठमुंबरी, कुणकेश्वर, विजयदुर्ग येथिल बीच चा समावेश आहे ,या अभियानामध्ये शालेय विद्यार्थी,शिक्षक ,देवगड येथील उपनगराध्यक्ष तसेव येथील नगरसेवक ,तसेच स्थानिक सरपंच व नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत सकाळी 9 ते 11 यावेळेत किनारा स्वच्छता उपक्रम करण्यात आला ,यामध्ये एकूण – 6 गावातील 409 विदयार्थी- विद्यार्थिनी ,(सहभागी 6 हायस्कूल व 1 महाविद्यालय) व 230 नागरिक सहभागी झाले ,सर्व ठिकाणी स्वच्छता उपक्रम पूर्ण झाल्यावर सुमारे 400 सिमेंट पिशव्या प्लॅस्टिकसह अन्य कचरा जमा झाला ,सर्व ठिकाणी स्वछताविषयक प्रतिज्ञा व अभियानाची माहिती, देण्यात आली ,देवगड येथील कार्यक्रमात देवगड नगर पंचायत च्या 2 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात वृक्ष भेट देऊन रा स्व संघ सिंधुदुर्ग चे मा जिल्हा संघचालक रवी मराठे , व जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फोटो- रा स्व संघाचा पर्यावरण आयाम ,सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून सागर किनारा स्वच्छता अभियांन देवगड तालुक्यामध्ये संपन्न झाले.
