सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीमध्ये सुसुत्रता आणा

विठ्ठल देसाई यांनी पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांचे वेधले लक्ष

⚡कणकवली ता.२५-: आधारभूत किंमत भात खरेदी योजना हंगाम २०२२ – २३ लवकरच सुरु होणार आहे. शेतकऱ्यांचा भात कापणी हंगाम ऑक्टेंबर महीन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात सुरु होतो. परंतु भात मळणी वेळेत होत नसल्याने भात खरेदीस विलंब होतो. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीमध्ये सुसुत्रता येण्याकरीता विविध मुद्यांवर विचार व्हावा अशी मागणी कणकवली तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे

पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांना सादर केलेल्या निवेदनात चेअरमन विठ्ठल देसाई म्हणतात,
१) यापुर्वी शासनाने मार्च अखेरपर्यंत भात खरेदीस मुदतवाढ दिलेली होती. मात्र मागील वर्षांपासून जानेवारी अखेरपर्यंत भात खरेदीस मुदतवाढ दिल्याने त्या मुदतीतच खरेदी केंद्रावर भात येत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी भात विक्रीपासून वंचीत राहतात. तरी ३१ मार्च २०२३ पर्यंत भात खरेदीची मुदत असावी. २) गतवर्षीचे शेतकऱ्यांचे बोनस (अनुदान) अद्याप मिळालेले नाही. चालूवर्षी प्रति किंन्टल रु.१०००/- प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान मिळावे व बळीराजाला आर्थिक दिलासा द्यावा. तसेच अनुशांगीक खर्चामध्ये हमाली खर्च रु. १०.७५ आहे. सद्याचे मजूरीचे दर पाहता प्रति क्विटल रु. २०/- हमाली दर मिळावा,
३) सन २०१५-२०१६ मध्ये संस्थानी भात खरेदी केलेली आहे. त्याची भरडाई न झाल्यामुळे शासनाकडून फक्त हमालीची रक्कम देण्यात आलेली आहे. उर्वरीत अनुशांगीक खर्च (कमिशन व गोडावून भाडे ) इत्यादी शासनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही. तरी सदरची रक्कम मिळावी.
४) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदी सुरु होताच भात भरडाई लवकर होण्याकरीता जास्तीत जास्त मिलरची नेमणुक करून भाताची उचल तातडीने व्हावी म्हणजे संस्थांना भात साठवणुकीची अडचण होणार नाही.
५) म. वि. आ. सरकारने ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरणा केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. तरी सदरची कर्जमाफीची सवलत मिळावी अशी विनंती आहे. तरी वरील सर्व बाबींबाबत मंत्री महोदय यांनी सहानुभुती पुर्वक विचार करुन संस्थेला व शेतकऱ्यांना लाभ मिळवुन द्यावा अशी मागणी कणकवली तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page