सेवानिवृत्त शिक्षक गजानन सावंत समाजासाठी झ्टणारे नेतृत्व होते

बांदा लायन्स क्लब अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांचे भावोद्गार

⚡बांदा ता.२५-: शैक्षणिक व सामाजिक कार्यात नेहमीच झोकून देऊन काम करणारे तत्पर व हसतमुख व्यक्तिमत्व ज्येष्ठ शिक्षक गजानन सावंत यांच्या आकस्मिक निधनाने समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मान हा नेहमीच ठेवण्यात येईल हीच त्यांना खरी आदरांजली असेल असे भावोदगार बांदा लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी येथे काढले.
लायन्स क्लबचे सहसचिव असलेले गजानन सावंत यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री पेडणेकर बोलत होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी लायन्स क्लबचे सचिव समीर कोलते, खजिनदार नाना सावंत, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, रणधीर रणसिंग, निलेश देसाई, मधू देसाई, सुनील धमापूरकर, संदीप बांदेकर, निलेश मोरजकर, राकेश केसरकर, दीपक सावंत, विनेश गवस, बाबा गाड, अमोल गाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक सावंत यांनी केले. आभार रणधीर रणसिंग यांनी मानले.
फोटो :-
बांदा येथे (कै.) गजानन सावंत यांना आदरांजली वाहताना बांदा लायन्स क्लबचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page