⚡कणकवली ता.२१-: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लवकरच संपन्न होत आहे.या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीने अधिकृत उमेदवार म्हणून धनाजी पाटील यांची निवड केली आहे.कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या धनाजी पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची धावती भेट घेतली.
यावेळी निवडणूकीबाबत चाललेल्या घडामोडींचा आढावा घेतला.यावेळी शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार धनाजी पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी धनाजी पाटील यांनी शिक्षकांना उपयुक्त ठरणारे संकलन शिक्षकांसाठी या संग्रहाच्या निर्मिती केल्याबद्दल, त्यांचे अभिनंदन करून पुढील अधिक चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या संग्रहित पुस्तकाचे आम.कपिल पाटील यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आले आहे.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना धनाजी पाटील यांनी कोकण विभागातील शिक्षक मतदार संघात आलेले विविध अनुभवांचा गोषवारा सादर केला. सध्या शिक्षकांमधून केवळ शिक्षकी पेशात कार्य असणाराच प्रतिनिधी विधान परिषदेवर प्रतिनिधी म्हणून निवडून दिला जावा या मताने जोर पकडला आहे.
शिक्षक भारतीनेही सुमारे 35 वर्षे एवढा शिक्षक चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या धनाजी पाटील यांच्यासारख्या जेष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन शिक्षकांच्या विचाराला रीतसर पाठिंबा पाठबळ दिले आहे.
दरम्यान या सभेच्या वेळी धनाजी पाटील आणि संजय वेतुरेकर यांनी शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यपद्धती विषयी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तरपणे माहिती दिली.
सर्व तालुक्यातील शाळा मधून पात्र असलेल्या सर्व शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी फॉर्म सादर केला जाईल याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत नियोजन करण्यात आले.
शिक्षक भारतीचे उमेदवार धनाजी पाटील यांनी सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट
