कणकवली मतदार संघात ३३१ बुथवर पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे वितरण

⚡कणकवली ता.२१-: कणकवली विधानसभा मतदार संघातील ३३१ बुथवर आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे वितरण करण्यात येणार असून प्रत्येक बूथ अध्यक्षांनी आपल्या बूथ वर मोठ्या उत्साहात पंडित दीन दयाळ उपाध्याय जयंती साजरी होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

पं. दीनदयाळ यांच्या प्रतिमेचे वितरण भाजपा जिल्हा कार्यालय, कणकवली येथे करण्यात आले. त्यावेळी कणकवली माजी सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, पडेल मंडल अध्यक्ष डॉ. अमोल तेली, देवगड मंडल सरचिटणीस शरद ठुकरूल, कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, अंकित सावंत, अजय घाडीगावकर आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page