भरड दत्त मंदिरात ५ ऑक्टोबरपासून कीर्तन पंचक

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील भरड दत्त मंदिरात १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सवानिमित विविध कार्यक्रम आयोजित केले असून यानिमित्त कीर्तन पंचक २०२२ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विविध ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तने सादर होणार आहेत.

यामध्ये १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. गांगेश्वर भजन मंडळ, ओरोस खुर्दचे बुवा ज्ञानदेव मेस्त्री (पखवाज-बंटी मेस्त्री, भावेश मेस्त्री) आणि ब्रह्मदेव भजन मंडळ, उपळे, राजापूरचे बुवा केदार कदम (पखवाज सर्वेश पाळेकर, तबला ओंकार लब्दे) यांच्यात प्रश्नोत्तरी भजनबारी सामना होईल. कीर्तन पंचक महोत्सवामध्ये ५ रोजी बुवा विलास गरवारे कुरोली-सिद्धेश्वर, सातारा विषय-गरुड गर्वहरण. ६ रोजी बुवा हर्षद जोगळेकर, पुणे विषय – अरुणिमा सिन्हा (पर्वतारोही), ७ रोजी बुवा हरिहर नातू मालवण विषय – कृष्णलीला. ८ रोजी बुवा विवेक जोशी वाळपई (गोवा) विषय-रामेश्वर लिंग स्थापना, ९ रोजी बुवा श्यामसुंदर महाराज सोन्नर विषय आदिशक्तीचा जागर. १३ रोजी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वा. भजन, रात्री १० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, १५ रोजी चलचित्र देखाव्यासह ढोल-ताशांच्या गजरात श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आपे आहे.

You cannot copy content of this page