सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनची सभा

⚡मालवण ता.२१-: जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवण कार्यकारिणीची मासिक सभा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुका स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे.

सभेत जिल्ह्यात होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. या सभेला जिल्हा प्रतिनिधी कृष्णा पाताडे व प्रताप बागवे मार्गदर्शन करणार आहेत. मालवण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सचिव रुपाली पेंडुरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page