⚡मालवण ता.२१-: सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय एससी एसटी हब तर्फे मालवण येथे गुरुवार दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कन्याशाळा हॉल मालवण येथे एससी- एसटी उद्योजकांसाठी मार्गदर्शन व सरकारी योजनेतील झालेले नवीन बदल यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उद्योजकांना चालना देण्यासाठी, MSEs चा सार्वजनिक खरेदीमध्ये प्रभावी सहभाग सक्षम करण्याचा प्रयत्न करणे, क्षमता बांधणी आणि कौशल्य विकास, विक्रेता विकास कार्यक्रम,(VDPs), राज्य परिषद, एससी एसटी उद्योजकांच्या योजना, भागधारकांच्या सोबत सहकार्य, कॉल सेंटर याची माहिती व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमातीतील उद्योजकांना उद्योगातील समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे. यासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास एससी -एसटी उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय एससी – एसटी हब राष्ट्रीय समिती सदस्य विजय केनवडेकर यांनी केले आहे.
