कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळे, बिस्किटे, पाणी वाटप
⚡कणकवली ता.२०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना सेवा सप्ताहानिमित्त मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कणकवली भाजपा मंडलाच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळे, बिस्किटे, पाणी बॉटल रुग्णांना माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण,युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका मेघा गांगण,माजी नगरसेवक किशोर राणे,संजय कामतेकर, शिशिर परुळेकर, गणेश तळगावकर, संतोष पुजारे, समीर प्रभुगावकर, महेश सावंत, सुभाष मालंडकर,सदानंद चव्हाण, राजू पेडणेकर आदी उपस्थित होते.
