मनसे पदाधिकारी राजू कासकर
⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी शहरात मनसे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यांच्यामध्ये झालेला मारहाणीचा प्रकार हा परप्रांतीयांच्या विषयावरून झाला आहे. त्यामुळे कोण खोटे प्रकरण करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही दबणार नाही तर अशा प्रकाराला पूर्णविरोध करू असा इशारा मनसे पदाधिकारी राजू कासकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
तर सावंतवाडी शहरांमध्ये परप्रांतीयांना अभय देण्यास गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादीच कारणीभूत आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात परप्रांतीच्या विळख्यातून शहर मुक्त करण्यासाठी लवकरच शहरात कोणत्या गाळे कोणाच्या नावावर आहेत याचा शोध घेणार असल्याचेही कासकर यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत आदेश सावंत मंदार नाईक बाळा बहिरे प्रवीण गवस संतोष भैरवकर आदी उपस्थित होते.
म्हणाले शहरातील मनसे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षामध्ये झालेला हा प्रकार केवळ आणि केवळ परप्रांतीयांच्या विषयावरून झालेला आहे यासंदर्भात त्यादिवशी व्हाट्सअप ग्रुप वर झालेली चर्चा आणि त्याचे स्क्रीन शॉट पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे त्यामुळे कोण शहराच्या सुसंस्कृतपणाची भाषा करत असेल तर आम्ही शहराचेच नागरिक आहोत त्यामुळे या शहराची संस्कृती आणि सुसंस्कृतपणा आम्हाला माहिती आहे या आधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर किती गुन्हे दाखल आहेत हे पहावे आणि नंतरच संस्कृतीची भाषा करावी. आज शहरामध्ये फिश आणि फुल मार्केट सोडता अन्य मार्केटमध्ये परप्रांतीय फोफावले आहेत याला कारणीभूत राष्ट्रवादीच आहे घरातील गेल्या पंधरा वर्षांमध्ये राष्ट्रवादीकडून या परप्रांतीयांना अभय देण्यात आला आहे त्यामुळे शहरात कोणाच्या नावावर किती गाळे आहेत याचा शोध आम्ही लवकरच घेणार आहोत परंतु हे आरोप करत जर कोण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही.
