पखवाज वादन परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा अश्मेष लवेकरचे यश

⚡कणकवली ता.२०-: अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, भारतीय संगीत कला पीठ पखवाज वादन प्रथम परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी मधील अश्मेष अनिरुद्ध लवेकर यांने उत्तम गुणासह या परीक्षेत अभिनंदनीय यश संपादन केले आहे.

गुरुमाऊली सौभाग्य लक्ष्मी सोनू संगीत साधना विद्यालयाचे अजित गोसावी व पखवाज अलंकार महेश सावंत यांचे तसेच पालकांचे ही त्याला विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये पर्यवेक्षक नारायण कुचेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page