सातारा बँकेचे पथक करणार जिल्हा बँकेचा अभ्यास
अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले स्वागत

ओरोस ता १९
देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँकेने अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड करावी हि आमच्या दृष्टीने अभीमानास्पद बाब असल्याचे मत जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्यक्त केले.
सातारा जिल्हा बँक हि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा बँक असुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रगतशील कार्यपध्दतीचा अभ्यास करण्याबाबत नाबार्डने सातारा जिल्हा मध्य. सहकारी बँकेस अभ्यास दौरा आयोजीत केला होता. त्यानुसार सातारा जिल्हा बँकेच्या १३ अधिका-यांचे एक पथक सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यलयात दाखल झाले. यावेळी जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक महेश सारंग, प्रकाश मोर्ये, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या सर्व अधिकारी पथकाचे स्वागत केले.
सातारा जिल्हा बँक हि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची नामांकीत बँक असुन महाराष्ट्र शासन, नाबार्ड राज्य बँक, नँफस्कॉब, राज्यबँक असोसिएशन व इतर नामांकीत संस्थाचे १०१ पुरस्कारांनी सातारा जिल्हा बँकेस सन्मानित करण्यात आले आहे. सरव्यवस्थापक-राजीव गाढवे, व्यवस्थापक- यशवंत साळुंखे, उपव्यवस्थापक -प्रशांत देशमुख, प्रोजेक्ट मँनेजर प्रकाश टकले, आय टि विभाग-अजय पाटील, अकौंटंट, गुतवणूक- विनोद ढाणे, राजेंद्र गायकवाड, घनशयाम सावंत, अमोल गुजर, तानाजी जानुगडे, अभयसिंह गायकवाड, चक्रधर पोतदार, रोहीत घोरपडे, बँक ऑडीटर- उदय कुलकर्णी आदी अधिकारी पथकाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट दिली व प्रत्येक विभागाची भेट देउन बँक कामकाजाची माहीती जिल्हा बँकचे अधिकारी कर्मचा-यांकडून घेतली. सातारा जिल्हा बँकेच्या अधिकारी पथकाचा हा ३ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. जिल्हा बँकेच्या काही शाखांना भेटी देउन हे पथक बँक शांखामधील कामकाजाची माहीती घेणार आहेत.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: सातारा जिल्हा बँकेच्या अभ्यास पथकाचे स्वागत करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सोबत उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक प्रकाश मोर्ये, महेश सारंग व अन्य

You cannot copy content of this page