देवगड (प्रतिनिधी)
तटरक्षक दल, रत्नागिरी यांनी विजयदुर्ग ते देवगड दरम्यान
४० ते ४५ वाव पाण्यात बुडालेल्या पार्थ जहाजाच्या नजीकच्या परिसरातील पाहणी देवगड महसूल प्रशासन,
सहा.मत्स्यव्यवसाय आयुक्त,सागर पोलीस दला मार्फत संयुक्त पाहणी सागरी गस्ती नौकेद्वारे नजीकच्या देवगड बंदर परिसरात भागात करण्यात आली .यात तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,सहा.मत्स्यव्यवसाय आयुक्त रवींद्र ताम्हणकर,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे व अन्य यांनी समुदात फिरून पाहणी केली व कोणतेही द्रव व घनप्रदार्थ ,अथवा आक्षेपार्ह काहीही आढळून आलेले नसल्याचे तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान “पार्थ” ( IMO No. ९४४०२२७) हे १०१ मी. लांबीचे
तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाल्याचे कळविले होते . सदर अपघात दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.३०
वाजता अपघातग्रस्त झाले होते त्यावर १इथोपियन १८ भारतीय खलाशी होते. जहाजावरील खलाशी यांना वाचविण्यात आले आहे. सदर जहाज दुबई हुन मंगलोर कडे इंधन घेऊन जात होते.परंतु सदर अपघातामुळे
विजयदुर्ग ते मालवण समुद्र भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता होती त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी महसुल मस्तव्यवसाय.व सागर पोलीस दलामार्फत संयुक्त पाहणी करण्यात आली.
फोटो-अपघातग्रस्त इंधनवाहू पार्थ जहाज
.
सुरक्षा यंत्रणेकडून पार्थ जहाज परिसराची पाहणी
