राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा
⚡सावंतवाडी ता.१७- : राष्ट्रीय परिवहन चालक दिनाचे औचित्य साधून राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी बस स्टॅन्ड येथे जाऊन तेथील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना व चालकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी सावंतवाडी रा.प महामंडळाचे स्थानक प्रमुख श्री संतोष पवार , वरिष्ठ लिपिक राम वाडकर चालक अजित कदम ,सचिन भांबुरे ,स्वदेश नाईक ,अमोल कदम, सचिन साळगावकर ,कार्यशाळा कर्मचारी सुनील गुंजाळ, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, सल्लागार सुरेश भोगटे ,उपाध्यक्ष विजय पवार ,बंड्या तोरस्कर ,सचिव दीपक सावंत, महादेव राऊळ , अरुण घाडी, उमेश खटावकर ,फास्को फर्नांडिस, संजय साळगावकर ,संदीप नाईक, कौस्तुभ यादव मंतेश पडते, सोन्या कासार , चिंटू खानोलकर व रवी जाधव उपस्थित होते. चालक हा रा. प.महामंडळाचा मुख्य कणा मानला जातो. वर्षाचे बाराही महिने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये आपल्या जीवाची परवा न करता हा चालक ग्राहकांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम करणारा ग्राहक वर्गाचा हा मोठा दुवा मानला जातो. म्हणूनच या गोष्टीचे औचित्य साधून या मंडळाने चालक मंडळींना व वरिष्ठ कर्मचाऱ्यांना राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या व अशीच सुखरूप आणि चांगली सेवा याही पुढे ग्राहकांना द्यावी अशी अपेक्षा या मंडळाने व्यक्त केली.
