जलक्रीडा, प्रवासी वाहतूक व मालवाहतूक नौकांची नोंदणी करण्याचे आवाहन

⚡मालवण ता.१६-: प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूहांतर्गत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्हयातील सागरी किनारी जलक्रिडा, प्रवासी वाहतुक व मालवाहतुक करणाऱ्या जलयानांची (नौकांची) नांदणी केली नसल्यास त्वरीत सक्षम प्राधिकाऱ्याकडून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डातर्फे प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अनधिकृपणे जलवाहतुकीमुळे जीवीत व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता आहे. सद्या उघाडीच्या हंगामामुळे (फेअर सिजन) सिंधुदूर्ग सागरी किनारी जलपर्यटन व प्रवासी व मालवाहतुकीच्या हालचाली चालु झाल्या असून जल प्रवासी व जल पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने जलयानांची (नौकांची) तपासणी व नोंदणी करून न घेता जल वाहतुकीचे प्रकार उघडकिस येत असुन पर्यटन व जल प्रवासी वाहतुक करणाऱ्या संघटनांनी / व्यावसायिकांनी जलयान सक्षमतेची (SEAWORTHINESS OF SHIP) तपासणी व नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. याप्रकरणी नौकांची नोंदणी न करता अनधिकृत जलवाहतुक केल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अनधिकृत हातपाटीने रेती उत्खनन व वाहतुक करणाऱ्या नौका तसेच सागरी सुरक्षा व अतिरेकी कारवायांची शक्यता पाहता स्थानिक नौकांची माहिती ओळख असणे महत्वाचे असून विना नोंदणी नौकांची नोंदणी झाल्यास सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक वेळी कारवाई करणे सोयीस्कर होणार आहे. त्यासाठी विना नोंदणीकृत जलयानांची नोंदणी होणे अत्यंत गरजेचे आहे. यानुसार सागरी सुरक्षा व लोकहिताची बाब लक्षात घेऊन नौका मालकांनी आवश्यक कागदपत्रे या कार्यालयास सादर करून आपपल्या बोटींची नोंदणी करून घ्यावी, असेही प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page