रोणापाल छात्रालयाला आर्थिक मदत

⚡बांदा ता.१३-: ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा ट्रस्ट संचालित दयासागर छात्रालय रोणापाल वसतिगृहाला गावातील युवा उद्योजक प्रशांत प्रकाश गावडे यांनी आर्थिक मदत केली. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, स्वाती प्रशांत गावडे व तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गावडे उपस्थित होते.
गोरगरीब, अनाथ, आई-वडील नसलेल्या, पालक व्यसनी असतील तर अशा मुलांसाठी येथील वसतिगृहात जेवण व इतर सर्व सुविधा देऊन शिक्षण व्यवस्था केली जाते. असे कार्य गेली चौदा वर्षे सुरू असल्याचे वसतिगृहाचे व्यवस्थापक जीवबा वीर यांनी सांगितले. त्यांच्याकडेच आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

You cannot copy content of this page