Headlines

सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांना ‘द रियल हिरो २०२२’ अवॉर्ड जाहीर

२३ रोजी होणार सन्मान;डॉ संजय नाकाडे, कुमार खैरे यांच्या वाढदिनी होणार कार्यक्रम

⚡कुडाळ ता.१३-: २३सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा नांदेड, हिंगोली मित्रमंडळ डॉ.संजय नाकाडे आणि गुरुवर्य निखिल कुमार खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्पमित्र यांना ‘द रियल हिरो अवार्ड २०२२ ‘ने सन्मानित करण्यात येणार आहे. या अवार्ड साठी आडेली गावचे सुपुत्र , वन्य प्राणी व सर्पमित्र दिपक दुतोंडकर यांची निवड करण्यात आली आहे.

सर्पमित्र म्हणून तहानभुक सोडून रात्र अपरात्र न बघता आपल्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थी सेवा पुरवणार्या महाराष्ट्रतील १५,०००सर्पमित्र- मैत्री पैकी २५१ सर्पमित्र आणि सर्पमैत्रीणी यांना जिल्हा नांदेड ,हिंगोली. मित्रमंडळ,डॉ. संजय नाकाडे आणि गुरुवर्य निखिलकुमार खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राणीमित्रांचा…द रियल हिरो अँवार्ड 2022 .ने सन्मानित करण्यात येणार आहे.स्थळ नांदेड हिंगोली येथे दि.२३सप्टेबर रोजी प्रत्येक तालुक्यातील एक सर्पमित्र या प्रमाणे सिंधुदुर्गातील साधारण ४० सर्पमित्रापैकी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ८ सर्पमित्रांची निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page