मडुरा रेडकरवाडी येथील नारायण तोरसकर याला धान्य वाटप

सामाजिक बांधिलकीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव व श्याम हळदणकर यांनी केले वाटप

⚡सावंतवाडी ता.१३-: सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मडुरा रेडकरवाडी येथील रहिवाशी नारायण तोरसकर याला सामाजिक बांधिलकीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव व श्याम हळदणकर यांनी घरी मडूरा येथे जाऊन यथाशक्ती त्यांना दोन महिने पुरेल इतक धान्य वाटप केले.

मडुरा रेडकरवाडी येथील नारायण तोरसकर याला वयाच्या 34 व्या वर्षी अचानक हातापायाला अपंगत्व आल्याने तो गेली दोन वर्ष जाग्यावरच आहे. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याची मूकबधिर पत्नी घर सांभाळून त्याची तास सेवा करत आहे. उत्पादनाचे अन्य कुठचेही साधन नसल्या कारणाने तेथील ग्रामस्थ आपल्या परीने त्याला थोडीफार मदत करत असतात. संकटात सापडलेल्या या निराधार दापत्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातून मदत व्हावी असे नम्र आवाहनही माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव व श्याम हळदणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page