मालवण मधील निराधार व्यक्तीला अमेय देसाई यांनी मिळवून दिला अनाव अनाथाश्रमचा आधार…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण बाजारपेठेतील एकाकी जीवन व्यतीत करणारे वृद्ध व्यक्ती अरविंद रामचंद्र पोरे यांची मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी मित्र मंडळींच्या सहकार्याने अणाव अनाथाश्रमात व्यवस्था करून हक्काचा निवारा मिळवून देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

मालवण बाजारपेठ येथील वृद्ध रहिवासी अरविंद रामचंद्र पोरे हे एकटेच आपले जीवन व्यतीत करीत होते. ते एकेकाळी पनळी पत्रे, बेकरीसाठी लागणारे ट्रे वगैरे बनवून आपला उदरनिर्वाह करीत असत. त्यांना राहण्यासाठी हक्काचा निवारा तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय राहिली नसल्याने त्यांना अमेय देसाई यांच्या पुढाकाराने आणि विश्वास कांबळी, मनोज उर्फ राजू गिरकर , शैलेश पालव, राजेश पारधी, राजा शंकरदास यांच्या सहकार्याने त्यांना अणावं येथील अनाथाश्रमात भरती करून त्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यात आला. त्याच बरोबर सध्या चालू असलेल्या पितृपक्षा निमित्त आपल्या पितरांची आठवण म्हणून अनाथाश्रमातील वृद्धांना अन्नदान करून त्यांची विचारपूस करून अमेय देसाई यांनी त्यांच्या सोबत अनाथाश्रमात वाढदिवस साजरा केला.
यावेळी राजा शंकरदास , कांबळी , पालव, गणेश भिडवलकर , मनोज उर्फ राजू गिरकर, केदार देसाई, मंदार ओरसकर, उमेश हडीकर,दर्शन गावकर, हेमंत रामाडे, संतोष माणगावकर, वैभव मेस्त्री, वैभव खोबरेकर, करण खडपे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page