वाढदिनानिमित्त भाजपच्या काणेकर दाम्पत्याकडून नेब्युलायझर भेट

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे केला सुपूर्द

बांदा/प्रतिनिधी
भाजप बांदा शहर सहअध्यक्ष बाबा काणेकर व त्यांच्या पत्नी सौ. तन्वी काणेकर या दोघांच्या वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला नेब्युलायझर (वाफ घ्यायची मशीन) आणि वजन काटा त्यांचे वडील शामकांत काणेकर आणि आई सौ. अंजली काणेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
यावेळी बाबा काणेकर, सौ. तन्वी काणेकर, माजी सभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, भाजप महिला उपाध्यक्षा प्रियांका नाईक, भाजप महिला अध्यक्ष बांदा सौ. अवंती पंडित, ग्रामपंचायत सदस्य सौ. किशोरी बांदेकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, भाजप तालुका उपाध्यक्ष बांदा मंडल सिद्धेश पावसकर, माजी शहर अध्यक्ष केदार कणबर्गी, सिद्धेश शिरोडकर, तेजराज साळगावकर, सिद्धेश शेवडे, किशोर बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page