⚡कणकवली ता.०८-:
कणकवली बाजारपेठ येथील
रहिवासी तथा प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ उर्फ नाथा दत्तात्रय अंधारी (७९) यांचे अल्पशाचा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नात, सहा विवाहित मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आदर्श नॉव्हेल्टिचे मालक चेतन अंधारी यांचे ते वडिल होत.
बाजरपेठेत गुरुनाथ हे पान, सुपारी, नारळ विक्रीचा व्यावसाय करीत होते.नाथा या नावाने ते सर्वांना परिचित होते. शहरातील धार्मिक कार्यक्रमांत त्यांचे योगदान होते. महापुरुष मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
कणकवली बाजारपेठ येथील
गुरुनाथ अंधारी यांचे निधन
