⚡कणकवली ता.०७-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून रविवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायं. ४ पर्यंत भवानी सभागृह, भवानी मंदिर, तेली आळी, मनसे कार्यालयाशेजारी, कणकवली येथे
दूध पदार्थ प्रशिक्षण आयोजित केले आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक स्वयंसिद्धा कोल्हापूर हे प्रशिक्षण देणार आहेत.
यावेळी मलई बर्फी,दूध कोल्ड्रींक्स
, बासुदी, मलई पेढा, गुलाबजाम, मोजरेला चीज, रसगुले, लस्सी, पनीर इत्यादी प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणात ज्यांना उद्योग करायचा आहे किंवा ज्यांना काही स्वतःसाठी शिकायच आहे अशा मुली, महिला, व बचतगट यामध्ये सहभागी होऊ शकतात. हे प्रशिक्षण फक्त पंचवीस जणांसाठी आहे आणि त्यासाठी त्वरित नाव नोंदणी करावी व आपल्या ओळखीत कोणी असतील तर त्यांना ही माहिती द्यावी किंवा 9421235839 या नंबरवर व्हाट्सअप मेसेज करावा असे आवाहन संदीप सावंत यांनी केले आहे.
स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीतर्फे १८ रोजी दूध पदार्थ प्रशिक्षण
