चतुर्थी पूर्वी वेतन मिळवून दिल्याने व्यक्त केली कृतज्ञता
⚡कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांची गणेश चतुर्थी आनंददायी जावी यासाठी त्यांना गणेश चतुर्थीपूर्वी वेतन मिळावे यासाठी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी विशेष प्रयत्न करून वेतन मिळवून दिले. यासाठी संघटनेच्या वतीने त्यांच्या घरी जात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस संदीप बांदेकर, कोषाध्यक्ष मोहन गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश राऊळ, प्रफुल्ल बागवे, सिद्धार्थ मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी मालवण येथे अशोक सावंत यांच्या घरी जात शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे देखील आभार व्यक्त केले.
