१२ सप्टेंबर पर्यंत व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन
वैभववाडी संजय शेळके
राष्ट्रीय काॕग्रेसच्यावतीने तालुका स्तरीय गणेश चतुर्थीनिमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम क्रमांकास रोख ११ हजार १११, द्वितीय क्रमांक ७ हजार ७७७ रुपये, तृतीय क्रमांक ५.हजार ५५५ रुपये तर उत्तेजर्नाथ प्रत्येकी १ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आली आहेत. गणेशभक्तांनी आपल्या कुटुंबासोबत गणपती सजावटीचा कमाल एक मिनिटाचा व्हिडीओ खालील दिलेल्या व्हाॕटअॕप मोबाईल नंबरवर दिनांक २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत पाठवावा. व्हीडीओ सोबत स्वतःचे नाव, गाव, मोबाईल नंबर पाठवायचा आहे. अधिक माहीतीसाठी माजी सभापती मिनाताई बोडके 9404743605/ 9011177948 तसेच उपाध्यक्ष वसंत नाटेकर 8805768570 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष दादामियाॕ पाटणकर यांनी केले आहे.
